आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची राज्यशासनाला मागणी.!
चंद्रपूर (वि.प्र.) - गोल बाजारातील गाडेधारकांचा भाडेवाढ २०० पटीने वाढविलेला असुन हि भाडेवाढ अन्यायकारक असून ती मागे घेण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी राज्य सरकारकडे केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव विकास खरगे यांच्यासोबत भेट घेतली. यावेळी गाळेधारकांनी प्रतिनिधी म्हणून पाठविलेले अब्दुल एजाज, प्रशांत येनुरकर यांची उपस्थिती होती. त्यांनी संबंधित विषय समजून घेत मुंबई येथे याबाबत बैठक घेणार असल्याचे सांगितले.
गोल बाजार येथे १९९१ पासून पालिकेने भाडेवाड केलेली नव्हती. त्यानंतर सन २०१२-१३ पासून त्यांनी वाढविली. न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून गाळेधारकांनी पैसे देण्याकरिता चेक मनपा प्रशासनाकडे दिले होते. मात्र तत्कालीन आयुक्त संजय काकडे यांनी धनादेश घेण्यास नकार दिला होता. असा आरोप गाळेधारकांनी केला.आता २०० पट असून हि भाडेवाढ अन्यायकारक आहे. हि भाडेवाढ मागे घेऊन ५५६ गाळेधारकांना न्याय देण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली. हि त्वरित निकाली काढण्यासाठी मुंबई येथे बैठक घेणार असल्याचे मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव विकास खरगे यांनी सांगितले.