भद्रावती (ता. प्र.) - गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत आंतर महाविद्यालयीन ज्युडो स्पर्धा (मुले/मुली) दिनांक ३० ते ३१ डिसेंबर २०२२ रोजी निळकंठराव शिंदे विज्ञान व कला, महाविद्यालयं, भद्रावती येथे आयोजन करण्यात येत आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन्ही जिल्हातील विविध महाविद्यालयातील खेळाडू उपस्थीत राहणार आहेत. विविध वजन गटात ज्युडो (मुळे/मुली) खेळाडूंची गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचा संघ निवडला जाणारआहे. निवड झालेला संघ लवली विद्यापीठ, जालंधर येथे होणाऱ्या भारतीय आंतर विद्यापीठ क्रिडा स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.
विद्यापीठ स्तरीय ज्युडो स्पर्धेच्या कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, संस्थेचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे, संस्थेचे सहसचिव डॉ. विशाल शिंदे, संस्थेचे सदस्य प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, प्रा. रमेश चव्हाण, प्रा. डॉ. ज्ञानेश हटवार, प्रा. डॉ. सुधीर मोते, प्रा. किशोर ढोक, डॉ. गजेंद्र बेदरे, डॉ. नरेंद्र हरणे, डॉ. अपर्णा धोटे, डॉ. दहेगावकर, डॉ. वाढवे, डॉ. शशिकांत शित्रे, डॉ.नासरे, प्रा.प्रधान, श्री.अजिज शेख श्री.अजय आसुटकर, श्री.विशाल गौरकार, श्री.किशोर जथाडे, श्री. शरद भावरकर, श्री. पांडुरंग आखतकर, श्री. खुशाल मानकर, व विविध महाविद्यालयातील क्रीडा संचालक उपस्थित राहतील.
या स्पर्धेचा आनंद समस्त भद्रावतीकरांनी घ्यावा असे आवाहन आयोजक डॉ. विशाल शिंदे यांनी केले आहे.