भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती तालुक्यातील अरविन्डो कंपनीच्या कर्मचाऱ्याला जाब विचारण्यासाठी गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना मारहाण केल्याची घटना २३ तारखेला घडली. या प्रकरणी दोघांच्याही तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
प्रकल्पग्रस्त बंधू गाडगे यांनी शेताचा उचित मोबदला द्या नंतरच कामाला सुरुवात करा असा प्रश्न अरविंन्डो कंपनीच्या अधिकाऱ्यांना केला. यावरून कंपनीच्या अधिकारी व प्रकल्पग्रस्तात बाचाबाची झाली प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने असणारे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे, रुपेश मांढरे व सुरज पेंदाम यांनी अरविंन्डो कंपनीच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता या कंपनीचा कर्मचारी तनोज पंडिले यांनी या तिघांनाही मारहाण केली तर यांनी सुद्धा त्यांना मारहाण केली या घटनेत एकमेकांच्या तक्रारीवरून दोघावरी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस अधिकारी करीत आहे.