बल्लारपुर (का. प्र.) -
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सोलापूर शहर व जिल्ह्यातील चित्रपट निर्मिती संस्था, निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता, इतर कलावंत, तंत्रज्ञ या सर्वांचा कलावंत मेळावा व चित्रपटा संदर्भात अनुदान व इतर तांत्रिक बाबीकरिता आणि कलावंतांच्या चित्रपट क्षेत्रातील विविध समस्यांबाबत तसेच होणाऱ्या महामंडळाच्या निवडणुकीबाबत हितगुज साधण्यासाठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मा. मेघराज राजे भोसले व महामंडळातील ज्येष्ठ मार्गदर्शक व पदाधिकारी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्नेह मेळावा मंगळवार दि. २७/१२/२०२२ रोजी दुपारी १२ ते ३ पर्यंत आय.एम.ए. हॉल, डफरीन चौक, येथे आयोजित केले आहे.
तरी या मेळाव्यास आपण सर्वांनी उपस्थित राहावे. असे आवाहन अध्यक्ष श्री. मेघराज राजे भोसले यांच्या वतीने अभिनेते आशुतोष नाटकर, दिग्दर्शक प्रशांत शिंगे आणि लेखक व कॅमेरामन राजेश कानडे यांनी केले आहे.