प्राचीने जिल्ह्यात पटकाविले सुवर्णपदक .!
भद्रावती (ता. प्र.) - क्रिडा व युवक संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर , जिल्हा परिषद चंद्रपूर, जिल्हा क्रिडा परिषद चंद्रपुर, महानगरपालिका चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा स्तरीय रोलर स्केटिंग स्पर्धेत कुमारी प्राची भदंत पुणेकर जिल्ह्यात अव्वल येत सुवर्णपदक प्राप्त केले. तिची या स्पर्धेसाठी विभागावर निवड झाली. विभागीय स्पर्धेत ती चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे शिक्षण घेत असलेली वर्ग बारावीची विद्यार्थिनीनी कुमारी प्राची भदंत पुणेकर हिने चंद्रपूर येथे झालेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्णपदक प्राप्त केले आहे . रोलर स्केटिंग या स्पर्धत विभागीय स्पर्धेत ती चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे .
तिने प्राप्त केलेल्या या यशाबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे , प्राचार्य डॉ जयंत वानखेडे, क्रीडा शिक्षक रमेश चव्हाण, प्राध्यापक नरेश जांभुळकर, डॉ. ज्ञानेश हटवार, शेखर जुमळे, किशोर ढोक, समस्त प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या विद्यार्थिनीचे अभिनंदन केले . विभागीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या. या क्रीडा प्रकारात यश संपादन केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.