भद्रावती येथे 20 पासून व्याख्यानमाला.!

लोकमान्य विद्यालय भद्रावती येथे 20 पासून व्याख्यानमाला .. 22 ला सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची विशेष उपस्थिती .!
भद्रावती (ता.प्र.) - लोकसेवा मंडळ भद्रावतीचे आद्य संस्थापक अध्यक्ष स्व. निळकंठराव गुंडावार यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्थानिक लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात 20 जानेवारीपासून व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचे हे सतरावे वर्ष आहे. 
व्याख्यानमालेचे उद्घाटन 20 तारखेला सकाळी आठ वाजता होणार असून याप्रसंगी उद्घाटक म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे तसेच प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी ,तहसीलदार भद्रावती अनिकेत सोनवणे, ठाणेदार भद्रावती गोपाल भारती , संवर्ग विकास अधिकारी डॉ. मंगेश आरेवार, गटशिक्षणाधिकारी भद्रावती डॉ. प्रकाश महाकाळकर , लोकसेवा मंडळाचे माजी अध्यक्ष बळवंत दादा गुंडावार, माजी सचिव मनोहरराव पारधे, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार उपस्थित राहणार आहेत.
दिनांक 20 रोजी शुक्रवारला सायंकाळी साडेसहा वाजता माणूस माझं नाव या विषयावर व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले जाणार आहे. व्याख्याते म्हणून अमरावतीचे प्रखर विचारवंत व युवा कीर्तनकार सोपान कनेरकर उपस्थित राहणार आहेत .प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी चंद्रपूर कल्पना चव्हाण उपस्थित राहणार आहेत. दिनांक 21 ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक 22 रोज रविवारला दुपारी तीन वाजता सत्कार तथा मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्याचे वने, सांस्कृतिक तथा मत्स्य व्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार तसेच प्रसिद्ध सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय तर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.