भावेश चव्हाण यांनी जेसीआय बल्लारपूर वुडसिटी क्लबचे नवे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला.!
बल्लारपुर (का.प्र.) - जेसीआय बल्लारपूर वुड सिटी अध्यक्षांचा 2023 वर्षासाठीचा शपथविधी सोहळा सोमवार 16/01/2023 रोजी रात्री 9 वाजता मार्कंडेय हॉल येथे आयोजित करण्यात आला होता.
या वेळी वर्ष 2022 च्या अध्यक्ष वीणा दोतपेल्ली यांनी वर्षभरात केलेल्या कामाचा तपशील सादर केला.आयपीपी सुनील जैन यांनी नवीन अध्यक्षांची घोषणा केली.अध्यक्ष वीणा दोतपेली यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष भावेश चव्हाण यांना शपथ दिली.
नूतन अध्यक्ष भावेश चव्हाण यांनी उर्वशी चव्हाण, श्रीनिवास बुग्गावार, विकास राजूरकर, गोपाल खंडेलवाल, देविदास कामपेल्ली, गीता ओहरी, विशाल भाटिया, विनोद काबरा, गुलशन ओहरी, प्रवीण पोपली राजू मुंधड़ा, आशिष चावडा यांचा नव्या संघात समावेश केला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एम.एम.अँटोनी प्राचार्य माउंटफोर्ट स्कूल, अनूप गांधी, जितेंद्र बोरा, महेंद्र जोशी उपस्थित होते.तसेच ऑल इंडिया पॉवर लिफ्टिंग स्पर्धा मध्ये स्वर्ण पदक जिंकनारे अहमद इस्माईल ढाकवाला आणि कु. नीता जगतपाल वर्मा, या दोघांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात संजय गुप्ता, रवींद्र फुलझाले, दिलीप शहा अनूप कुटेमाते, प्रदीप भास्करवार, विनोद कोपरकर, संजय पोद्दार, राजेंद्र शर्मा, सोमेश खंडेलवाल, राकेश वखारिया, राजेश गिडवानी, तेजिंदर सिंग दारी, प्रकाश दोतपेल्ली, गुलशन ओहरी आदी उपस्थित होते.