बल्लारपूर (का. प्र.) - स्थानिक निलकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात दिनांक २६/०१/२०२3 रोजी मोठ्या थाटामाटात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी ध्वजारोहन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे याच्या हस्ते करण्यात आला. या वेळी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव डॉ कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ विशाल शिंदे, प्राचार्य डॉ एल एस लड़के उपस्थिती होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय छात्र सेनेच्या पथ संचालनाने करण्यात आली. तसेच या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.