भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे 74 वा प्रजासत्ताक दिन थाटात संपन्न झाला. संस्थेचे सचिव प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी मंचावर अध्यक्ष मोहन पुसनाके , विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्रा. डॉ. कार्तिक शिंदे,सचिव,भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्राचार्य एल. एस. लडके, प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे,पी. के. पाठक,रेणुका गायकवाड, मुख्याध्यापक प्रवीण शिंदे, धीरज ताजणे, मडावी सर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्य डॉ. जयंत वानखेडेे यांनी केले. मार्गदर्शन करताना सचिव डॉ. कार्तिक शिंदे यांनी हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. समताधिष्ठीत समाज रचनेची निर्मिती घटनेमुळे झाली. आपल्या अधिकारांसोबतच कर्तव्याची जाणीव ठेवावी असे मार्गदर्शन केले. मान्यवरांची प्रजासत्ताक दिनानिमित्त समयोचित भाषणे झाली .
खेलो इंडिया खेलो कबड्डी स्पर्धेसाठी राज्यस्तरावर निवड झालेल्या वैष्णवी मेश्राम तसेच सिलंबम स्पर्धेत राज्यस्तरावर निवड झालेली कुमारी कन्नाके यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. एन.सी.सी .पथकाचे पतसंंचालन तसेच मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्ती गीत असे विविध कार्यक्रम या प्रसंगी साजरे झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर सुधीर मोते यांनी केले तर आभार प्रदर्शन महादेव ताजणे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक रमेश चव्हाण, किशोर ढोक, डॉ. ज्ञानेश हटवार, कमलाकर हवाईकर समस्त प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.