भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथील प्रांगणामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे तसेच भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे सचिव डॉ. कार्तिक शिंदे, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. श्वेता शिंदे मॅडम, सौ.उज्वला वानखडे प्रमुख अतिथी, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. पियुष लांडगे , श्री. संदीप भागवतकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन केल्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व अतिथी यांचा परिचय व प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत पाठक यांनी करून दिला.
डॉक्टर विवेक शिंदे यांनी आजच्या दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. डॉ. कार्तिक शिंदे यांनी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याचे वर्णन केले. त्यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी उज्वला वानखडे मॅडम यांनी संविधानाची निर्मिती कशाप्रकारे परिश्रमाने बाबासाहेब यांनी केली, याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमातीलअध्यक्ष डॉक्टर श्वेता शिंदे यांनी भारतीय संविधान जगापेक्षा कसे वेगळे आहे, हे विद्यार्थी सांगितले. आभार प्रदर्शन लांडगे यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संखेत विद्यार्थ्यी, पालक, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.
दि. 27 जाने. चोरा येथे अनंत महाराज प्रगटदिन व पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन.! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्यांचे ही होणार अनावरण.!
भद्रावती तालुक्यातील चोरा येथे २७ जानेवारी व २८ जानेवारीला विदेही सद्गुरू श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती अभियान अंतर्गत स्व .श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट भद्रावती व श्री गुरुदेव सेवा मंडळ चोरा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री योगी अनंत महाराज मठ चोरा येथे दोन दिवशीय श्री योगी अनंत महाराज प्रगटदिन व वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५४ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाला स्व . मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे जेष्ठ चिरंजीव विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट वरोरा या संस्थेचे सचिव अमन टेमुर्डे हे असतील तर उदघाटक म्हणून शिवसेना वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे विधानसभा प्रमुख तथा स्व . श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे संथपक अध्यक्ष रवींद्र शिंदे , प्रमुख अतिथी म्हणून . ग्रामपंचायत चोरा येथील सरपंच संगीत खिरटकर , गुरुकुंज आश्रम मोझरीचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे , जिल्हा परिषद चंद्रपूर चे माजी सभापती तुळशीराम श्रीरामे, जयंत टेमुर्डे , माजी जिल्हापरिषद सदस्य मारोती गायकवाड , भद्रावती नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर डुकरे , माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवर , शिवसेना उपजिल्हा प्रमुख भास्कर ताजने , शिवसेना वरोरा तालुका प्रमुख दत्ता बोरेकर, भद्रावती पंचायत समितीच्या माजी सभापती विद्या सतीश कांबळे , माजी पंचायत समिती सदस्य महेश टोंगे , बंडू नन्नावरे , वासुदेव ठाकरे , खेमराज कुरेकार, प्रशांत डाखरे, भोलापाटील टोंगे , मंगेश भोयर , परसराम जांभुळे , इंदुताई नन्नावरे , प्रदीप महाकुलकर , संदीप उईके , डॉ . नरेंद्र दाते , इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहे . या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष स्व . मोरेश्वरराव टेमुर्डे यांचे २२ जानेवारीला दुःखद निधन झाले . त्या प्रित्यर्थ शोक सभेचे आयोजन हि करण्यात आले असून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट भद्रावतीच्या सुरवातीच्या म्हणजेच पहिल्या कार्यक्रमापासून आज पावेतो झालेल्या व पुढे नियोजित असलेल्या सर्व कार्यक्रमाचे अध्यक्ष पद हे मोरेश्वरराव टेमुर्डे हे भूषवित होते . शोषित वंचितांची सेवा , जनसेवा हीच ईश्वर सेवा हे त्यांचे ब्रीद होते . या पुढे संस्थे तर्फे आयोजित सर्व कार्यक्रमाला टेमुर्डे साहेबांचे मोठे चिरंजीव अमन टेमुर्डे व जयंत टेमुर्डे हे सोबत असतील अशी माहिती संस्थेचे संस्थापक रवींद्र शिंदे यांनी दिली असून या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.