सामाजिक कार्यकर्ते सुमित (गोलु) डोहणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर, मोफत औषधी वाटप आजोयन व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटपाचे कार्यक्रम.!
बल्लारपुर (का. प्र.) - सामाजिक कार्यकर्ते सुमित(गोलु)डोहणे यांच्या वाढदिवसा निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन दिनांक 24 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले होते. सदर शिबीराचे आयोजन बुद्ध नगर वॉर्ड बल्लारपूर येथे करण्यात आले होते. या प्रसंगी इंजि. राकेश सोमाणी जिल्हाध्यक्ष रॉ.यु.कॉ.,डॉ. अनिल सर वाढई, माजी नगरसेवक इस्माईल भाई धाकवाले,बटघरे गुरुजी,आनंद भाऊ रामटेके, प्राध्यापक कांबळे सर, सय्यद अजीज भाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ. अमित दोडके, डॉ. किशोर पेंढारकर, डॉ. आकाश बोंबोडे, सुशांत मेश्राम, मनोज गवई, संघर्ष मेश्राम,आकांश मुरकुटे, व यावेळी विश्वशांती युवा मंच बल्लारपूर चे सर्व पदाधिकारी व मोठ्या संकेत कार्यकर्ते उपस्थित होते.
या मोफत आरोग्य तपासणी शिबीरामध्ये इ.सी.जी. तपासणी, दमा तपासणी, रक्तदाब तपासणी, तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, अस्थिरोग तपासणी (गुडघे व सांधेदुखी) इ. वैद्यकीय तपासणी व औषधे वाटप मोफत करण्यात आले. लहान मुले, तरुण व वृध्द या सर्वांची तपासणी व मोफत औषधे देण्यात आले. या शिबीरामध्ये संतोष माता वॉर्ड व बुद्ध नगर वॉर्डातील सर्व नागरीकांनी प्रचंड उपस्थिती दर्शविली आहे.
या शिबीरामध्ये जवळपास शेकडो रुग्णांची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच यावेळी शिबीरामध्ये तपासणीकरीता आलेल्या नागरीकांना डॉक्टरांकडून तपासणी, उपचार व सल्ला देण्यात आले. या तपासणी मध्ये मदतकर्ता व मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.तसेच ग्रामीण रुग्णालयात बल्लारपूर येथे सर्व रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.