बल्लारपुर (का. प्र.) - भद्रावती स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात दिनांक 25 /1 /2023 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ अजय दहेगावकर भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रमुख पाहुणे प्रा डॉ एन एस वाढवे प्रा डॉ शशिकांत सित्रे प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ कुंदन सहारे व कार्यक्रमाचे आयोजक प्रा डॉ राजेश हजारे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या स्वागताने झाली याप्रसंगी प्रा डॉ राजेश हजारे यांनी आपल्या प्रास्ताविकेतून राष्ट्रीय मतदार दिन का साजरा करतात या मागचे उद्देश स्पष्ट केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ कुंदन सहारे यांनी भारतीय राज्यघटनेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार त्यामुळे देशाचे लोकशाही बळकत होते .तसेच तरुणांनी मतदानाविषयी जागरूक असणे आवश्यक आहे कारण लोकशाहीत मताला स्वतःचे महत्त्व आहे कोणत्याही लोकशाही देशात सरकार बनवण्यात सर्वसामान्य जनतेची म्हणजेच मतदारांची सर्वात मोठी भूमिका असते मतदान करणे हा प्रत्येक जबाबदार नागरिकाचा हक्क व कर्तव्य आहे असे मार्गदर्शन केले.
तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा डॉ अजय दहेगावकर यांनी लोकशाहीची जननी समजल्या जाणाऱ्या प्रगतशील अमेरिका व इंग्लंड देशात महिलांना मतदानाचा अधिकार उशिरा प्राप्त झाला परंतु आपल्या देशाच्या नागरिकांना लवकर प्राप्त झाला त्यामुळे आपल्या देशाची लोकशाही बळकट झाली.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा डी एल भवरे आभार प्रदर्शन प्रा डॉ राजेश हजारे यांनी केले.
या राष्ट्रीय मतदार दिनी महाविद्यालयात निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते याकरिता बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता प्रा डॉ प्रवीण कुमार नासरे प्रा संदीप प्रधान प्रा डॉ एम एन खादरी यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाला महाविद्यालयातील बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.