माफिया च्या अवैध रेती तस्करी .!

कळमना साझा चे तलाठी यांचे वाळू माफिया च्या साठगाठीने बल्लारपूर तालुक्यात अवैध रेती तस्करी होत आहे, त्वरित रोखण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महासचिव आरिफ खान यांचे निवेदन.!
बल्लारपुर (का. प्र.) - कळमना साझा चे तलाठी यांचे वाळू माफिया च्या साठगाठीने बल्लारपूर तालुक्यात अवैध रेती तस्करी होत आहे, बल्लारपूर तालुक्यात वाळू माफिया चे दिवसोनदीवस प्रमाण वाढत आहे. या मुळे शासनाचे मोठे नुकसान होऊन शासनाचे महसूल बुढत आहे,तलाठी आणी वाळू माफियाचे साठगाठीने होत असलेली अवैध रेती तस्करी थांबविण्यात यावी व तलाठी यांच्या वर योग्य ती कारवाही करण्यात यावी, कारवाही न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फ आंदोलन करण्याचा ईशारा दिला आहे.
या निवेदनात उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महासचिव आरिफ खान, विधानसभा महिला अध्यक्ष शुभांगी ताई साठे, नीरज तिवारी, उज्वल माही, शराफत जाफरी, भाग्यवान मेश्राम, संजु अग्रवाल, विनोद गिदवाणी, संस्कार सुखदेव, शुभम लभाने, अमर राहिकवर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.