क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांची जयंती संपन्न.!

भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी, भद्रावती येथे  आद्य शिक्षिका , शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडणाऱ्या  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  व फातिमा शेख यांची जयंती संपन्न झाली . अध्यक्ष मार्गदर्शन करताना प्रा. सौ. उज्वला वानखेडे यांनी "क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करावा" असे मार्गदर्शन केले.
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे संपन्न झालेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले  व फातिमा शेख यांच्या संयुक्त जयंती समारोहात अध्यक्ष म्हणून प्रा.सौ उज्वला वानखेडे, मार्गदर्शक म्हणून प्रा. प्रेमा पोटदुखे , संगीता जक्कुलवार, किशोर ढोक , डॉ. ज्ञानेश हटवार मंचावर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावरचेे गाणे गायले.मार्गदर्शन करताना प्रा. प्रेमा  पोटदुखे यांनी सावित्री फुले व फातिमा शेख यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून त्यांच्या विचाराची आज समाजाला गरज असल्याचे सांगितले. 
यावेळी विद्यार्थ्यांची  समायोचित भाषणे झाली. प्रांजली जगजाप, वैभव मगरे, निलेश कुलसंगे यांनी आपले विचार व्यक्त केले. प्राध्यापक डॉ. ज्ञानेश हटवार, किशोर  ढोक, संगीता जकुलवार  यांनी या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कु. प्रांजली एडमे  हिने केले  तर  कु. साक्षी ठवरी हिने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  प्रा. डॉ. सुधीर मोते, कमलाकर हवाईकर, माधव केंद्रे  तसेच विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.