बल्लारपुर (का.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके प्रमुख अतिथी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे उपस्थित होते.सर्वप्रथम उपस्थित सर्व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण केले.
याप्रसंगी भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तसेच स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या व अनंत अडचणीवर मात करून मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल एस लडके यांनी सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करीत स्त्री शिक्षणासाठी झटणाऱ्या विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट कशी दाखविली यावर सखोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विकास विभाग समन्वयक प्रा डॉ अपर्णा धोटे तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा डॉ गजेंद्र बेदरे यांनी केले.या कार्यक्रमाकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.