वणी (वि. प्र.) - क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त वणीमध्ये ७ व ८ जानेवारीला २ दिवसीय विविध स्पर्धाचे आयोजन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय,विठ्ठलवाडी वणी येथे करण्यात आले आहे. ७ जानेवारी २०२३ ला दुपारी १२:०० वाजता चित्रकला स्पर्धा यामध्ये गट (अ)वर्ग १ ते ४ थी माझी शाळा, गट (ब) वर्ग ५ ते ८ वी छत्रपती शिवाजी महाराज अथवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, गट (क) वर्ग ९ ते १२ वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अथवा मदर टेरेसा यांचे चित्र काढायचे आहे. ७ जानेवारी २०२३ ला सायंकाळी ०५ :०० वाजता प्रकटवाचन स्पर्धा गट (अ) वर्ग ३ ते ५ वी व गट (ब) वर्ग ६ ते ८ वी यामध्ये आहे आणि ८ जानेवारी २०२३ ला निबंधलेखन स्पर्धा गट (अ) वर्ग ५ ते ८ वी यामध्ये विषय राजमाता जिजाऊ माँ साहेब, गट(ब) वर्ग ९ ते १२ वी यामध्ये विषय परीक्षा पद्धती बंद केली तर... असे आहे. तरी या २ दिवसीय विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने करण्यात येत आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धा.!
byChandikaexpress
-
0