चंद्रपुर चे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांच्या हस्ते पत्रकार दीन सोहळा 2023 चे उदघाटन ..!
चंद्रपूर (वि.प्र.) - विदर्भ संपादक, पत्रकार बहुउद्देशीय संस्था च्या वतीने आचार्य बाळशास्त्री जाभेकर यांच्या जयंती निमीत्त पत्रकार दिन समारोह 2023 या कार्यक्रमाचे आयोजन 6 जानेवारी 2023 दुपारी 3 वाजता आय. एम.ए. हॉल गंजवार्ड,चंद्रपूर येथे करण्यात आले हा कार्यक्रम जेष्ठ पत्रकार यशवंत दाचेवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला . कार्यक्रमाचे उदघाटन चंद्रपुर चे जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांचे हस्ते दीप प्रज्वलन करून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला मालार्पण करून संपन्न झाले . प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा परिषद चंद्रपुर चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, चंद्रपूर चे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेसी,चंद्रपूर,मुख्य अतिथि,सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर सह कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष विदर्भ संपादक,पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष सय्यद रमज़ान अली व कार्याध्यक्ष शेख अनवर मंचावर विराजमान होते.पत्रकार दिन समारोह 2023 च्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रात सक्रियरित्या कार्यरत असलेले मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.
वैद्यकीय सेवेत स्वतहाला झोकून देणारे नामवंत डॉक्टर्स यांना पुरस्काराने सन्मानित केले. डॉ.महावीर सोईतकर, डॉ.सतीश तातावार,डॉ.हेमंत पुट्टेवार,डॉ.प्रवीण पंत यांनी आपल्या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केल्याने या मान्यवरांना आदर्श वैद्यकीय सेवा रत्न पुरस्काराने उपरोक्त मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले असून वैद्यकीय क्षेत्रात असून ही क्रीडाक्षेत्रात आपले नावलौकिक केले आहे.असे डॉ.रिजवान अली शिवजी व डॉ.प्राजक्ता अस्वार यांना आदर्श क्रीडारत्न या पुरस्काराने सन्मानित केले आहे. शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करत उंच भरारी घेणारे अशोक जीवतोडे यांना आदर्श शिक्षण सेवा रत्न पुरस्कार व पत्रकारीतेच्या क्षेत्रातील राजू वानखेडे यांना दर्पण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सय्यद आबिद अली यांना बिरसा मुंडा सेवा रत्न पुरस्कार पत्रकार मनोज गोरे यांना ग्रामीण वार्ता पुरस्कार पत्रकार एम. के. सेलोटे यांना आदर्श लोकवार्ता पुरस्कार इलेक्ट्रॉनिक मीडिया चे विनोद दुर्गे यांना शोधदूत पुरस्कार विधवा व निराधार महिलांच्या उत्थानासाठी नेहमी कार्यरत शाईस्ता पठाण याना आदर्श समाज रत्न पुरस्कार शरणम् बहुउद्देशीय संस्था चे संस्थापक - अध्यक्ष शेखर तावाडे यांना आदर्श समाजभूषण पुरस्कार क्रीडाक्षेत्रात आपले नावलौकिक करीत अनेक खेळाडू ज्यांच्या माध्यमातून घडले असे विजय आडकुजी चहारे यांना क्रीडारत्न पुरस्कार महिलांना सक्षम करणासाठी अविरत कार्य करणाऱ्या सूनिता गायकवाड यांना आदर्श समाजसेविका पुरस्कार इलेक्ट्रॉनिक मीडिया यू ट्यूब च्या माध्यमातून पत्रकार नेहा शंकर ज्यांनी अनेकांना न्याय मिळवून दिले व आज ही त्या सक्रिय असल्याने त्यांना आदर्श समाज रत्न पुरस्कार चंद्रपूर सायबर पोलिस मध्ये कार्यरत मुजावर युसुफ अली यांना सायबर अन्वेषण सेवा रत्न पुरस्कार चंद्रपूर महानगरपालिका चे सफाई कामगार संजय हजारे यांना स्वच्छ्ता दूत पुरस्कार श्रुती लोणारे यांना आदर्श प्राणी सेवा रत्न पुरस्कार पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे तहसीन अख्तर यांना आदर्श लेखक पुरस्कार उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विदर्भ संपादक,पत्रकार बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक - अध्यक्ष सय्यद रमज़ान अली यानी केले संचालन डॉ.आरती दाचेवार यानी केले.सर्व पत्रकारांनी या कार्यक्रमात हजर राहून कार्यक्रम यशस्वी केल्याने संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष शेख अनवर भाई यांनी सर्वांचे आभार प्रदर्शन केले विदर्भ संपादक पत्रकार बहुउद्देशिय संस्था चे संस्थापक अध्यक्ष सय्यद रमजान अली व कार्याध्यक्ष शेख अनवरभाई यांनी आपल्या संस्थेला कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना धन्यवाद दिले असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार आनंद पाल,नवाब पठाण,फिरोज दिनानी,राजू बिट्टूरवार,सुरेंद्र गांधी,गोपी मित्रा,शशिकांत ठक्कर,आक्केवार जी,मुळेवार,जुनेद अली, सह अनेक पत्रकारांनी अथक परिश्रम घेतले .