“विदर्भ राज्य आंदोलन समितीची विदर्भ निर्माण यात्रा दि. 23 फेब्रुवारी ला एतिहासीक बल्हारशाह नगरीत आगमन .. गांधी चौकात होनार सायंकाळी 7:00 वाजता जाहिर सभा .!
“मिशन २०२३ अंतर्गत आंदोलनाचा दुसरा टप्पा जाहीर"
बल्लारपूर (का.प्र.) - दि. १८ फेब्रुवारी २०२३ ला विदर्भ राज्य आंदोलन समिती बल्हारशाह तालूका व शहराची संयुक्त बैठक ॲड.वामणराव चटप साहेब यांच्या उपस्थीत बल्हारशाह येथील शासकीय विश्राम ग्रुह येथे विदर्भ निर्माण यात्रेच्या तैयारीच्या संदर्भाने घेण्यात आली. दिनांक १९ डिसेंबर २०२२ ला नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अर्थमंत्र्यांकडून सादर करण्यात आलेल्या पुरवणी अर्थसंकल्पात जलसंपदा विभागाच्या मागण्यांतून विदर्भ गायब झाला असून कायमचा हद्दपार करण्यात आला आहे.
दुर्दैवाने राज्याचे अर्थमंत्री व जलसंपदा मंत्री विदर्भातील, मूळ गाव मुल' चेच असताना नागपूर वरून राज्याच्या मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व करणार्यांनी "कुऱ्हाडीचे दांडे गोतास काळ" हा रोल पूर्णपणे अदा केला असल्याचे दिसून येत असून विदर्भातील एक ही काम या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आले नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाचे विदर्भात १ काम दाखवा १ लाख मिळवा अशी भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समितीने जाहीर करण्यात आले आहे.
जलसंपदा विभागाच्या पूरक मागण्या व विनियोजानात विदर्भातील ११ ही जिल्हे, १२० तालुके व ६२ विधानसभा मतदारसंघात जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट न करून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तथा अर्थ, नियोजन व जलसंपदा मंत्री यांनी विदर्भाचे जलसंपदा विभागाचे एकही काम समाविष्ट न करून विदर्भ द्वेष आचरणातून दाखवून दिला आहे. त्यांच्या या कृतीचा विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने दि. १८ जानेवारी २०२३ ला झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जाहीर निषेध करण्यात आला.
कोअर कमिटीच्या बैठकीत विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या द्वारे, दि. २१ फेब्रुवारी २०२३ पासून ते ५ मार्च २०२३ पर्यंत विदर्भातील ११ जिल्हे १२० तालुक्यात विदर्भ निर्माण यात्रा काळण्याचे ठरवीण्यात आले.
विदर्भ निर्माण यात्रेचे दि.२३/२/२०२३ ला बल्हारशाह शहरात आगमन होणार आहे,शहरातील मुख्य चौकातुन विदर्भ निर्माण यात्रा ही शहरातील वस्ती विभागात गांधी चौक येथे पोहचुन तेथे विदर्भ राज्य आंदोलन समिती,बल्हारशाह च्या वतीने जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी शहरातील युवकांशी व विदर्भवादी जनतेणी मोठ्या संखेत विदर्भ निर्माण यात्रेत व सभेत सहभागी होऊन स्वतंत्र विदर्भाच्या लढ्यात सहभागी होण्याचे आव्हाण विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी चे तालुका अध्यक्ष परग गुंडेवार,तालुका उपाध्यक्ष संजय घुगलोत,तालुका सचिव गौतम कांबळे,शहर अध्यक्ष रोहीत लोनारे,शहर सचिव संदिप केशकर सह विराआंस युवा आघाडी बल्हारशाह तर्फे करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या :-
१) केंद्र सरकरणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य तात्काळ निर्माण करावे.
२) विजेची दरवाढ राज्य सरकार ने तात्काळ मागे घ्यावी व शेतीपंपाला दिवसाचे लोड शेडींग बंद करावे.
३) वैधानिक विकास मंडळ नको,विदर्भ राज्यच हवे.
४)अन्यधान्यावरील G.S.T तात्काळ रद्द करावा.
५) बल्हारशाह, सुरजागड रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा.
६) खामगाव, जालना रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करून निधी उपलब्ध करून द्यावा.
७) विदर्भातील ११ ही जिल्हे ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावेत.