भद्रावती (ता. प्र.) - महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठ व संलग्न अनुदानित महाविद्यालय सोमवारपासून बेमुदत बंद राहणार आहेत . शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या राज्य शासनाकडे प्रलंबित प्रमुख सहा मागण्यांसाठी हे संप सुरू आहे. शिक्षकेत्तर ककर्मचारी यांच्या संयुक्त कृती समितीने राज्य शासनाला व शिक्षण संचालक पुणे यांना प्रलंबित प्रमुख सहा मागण्यांसाठी 1 फेब्रुवारीला निवेदनन देऊनही मागील चार वर्षापासून प्रलंबित रस्त मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. 2 फेब्रुवारीपासून हे आंदोलन सुरू झाले असून निदर्शने देऊन ,काळ्या फीती लावून, परीक्षा विषयक कामकाजावर बहिष्कार टाकून सरकारचे लक्ष वेधले. परंतु अपेक्षित निर्णय न झाल्याने बेमुदत संप करण्यात येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती पदाधिकारी व शासनाचे प्रतिनिधी यांच्यात मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत शासनाच्या समितीने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य असल्याचे सांगितले. याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी मागण्या मंजूर असल्याचे प्रसारित सुद्धा केले. जेव्हा कृती समितीने सदर बैठकीचे इतिवृत्त आल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची जाहीर केले, तेव्हा 17 फेब्रुवारीला बैठकीचे इतिवृत्त प्रसिद्ध केले .
शासनाने तयार केलेले इतिवृत्त बैठकीतील निर्णयाशी विसंगत असल्याने व इतिवृत्ताची भाषा मोगम व संदिग्ध असल्याने कृती समिती पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत बैठकीत झालेल्या निर्णयानुसार इतिवृत्त जोपर्यंत दुरुस्त होणार नाही तो पर्यंत 20 फेब्रुवारी पासून सुरू होणारे बेमुदत आंदोलन मागे घेणार नाही असे जाहीर केले. कृती समितीच्या प्रमुख मागण्या :-
1) सेवांतर्गत प्रगती योजना लागू करणे.
2) सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार 10 ,20 ,30 लाभाची योजना कर्मचाऱ्यांना लागू करणे.
3) सातव्या वेतन आयोगानुसार वंचित असलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे.
4) विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यास मान्यता देणे.
5) नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना चालू करणे .
आदि मागण्याच्या संदर्भात जोपर्यंत शासन निर्णय घेत नाही,
जोपर्यंत परिपत्रक काढून विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत कामकाज बंद राहील . कामकाज बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार आहे. परंतु नाईलाजाने हे पाऊल उचलण्याचे भाग पडत असल्याचे समितीने म्हटले आहे.
विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी प्रशांत रंदाई, संजय पडोळे ,विनोद चोपवार, विशाल गौरकार ,अजय सुटकर ,किशोर भोयर ,विजय मदनकर, सुकेशिनि देशभ्रतार, रवींद्र गोटेफोडे,प्रमोद तेलंग, खुशाल मानकर, शरद भावरकर, पांडुरंग आखतकर यांनी केले आहे.