बल्लारपूर (का.प्र.) - आकोला प्रतिनिधी स्थानिक पिपलोद तालुका दर्यापूर येथील कला फाऊंडेशन पिपळोद द्वारा आयोजीत संगीत महोत्सव व खूले कविसंमेलन रविवार दि .12 फेब्रूवारी 2023 ला दर्यापूर येथे अतिशय चांगल्या प्रकारे संपन्न झाले .
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अकोला येथील प्रसिद्ध लेखिका वनिताताई गावंङे ह्या होत्या .त्यावेळी महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून आलेल्या साहित्यिकांना विविध राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले पुरस्काराने सामाजिक कार्याचीआवळ निर्माण होऊन विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळतेअशा प्रकारचे कार्यक्रम ही काळाची गरज असल्याचे मतज्येष्ठ साहित्यिका गावंडे यांनीकार्यक्रमातुन् व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उद,घाटक मा .श्री बळवंताभाऊ वानखङे आमदार दर्यापूर हे होते. प्रमूख मान्यवर म्हणून मा. ज्ञानेश्वर सांग॓ळे मा. प्रशांत देशमूख मा. ङाॅ. मधूकर जाघवर मा.गणेश चोधरी श्री सुरज देशमूख हे होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन कला फाऊङेंशनचे अध्यक्ष मा . प्रशांत दामले सर यांनी केले होते .