भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या ऊत्साहात संपन्न झाली. अध्यक्ष मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य स्थापन केले, महिलांना सन्मान देऊन, शेतकऱ्यांच्या उन्नतीचा पाया रचला आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती समारोह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी प्राचार्य एम. यु .बरडे सर, डॉ. ज्ञानेश हटवार व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला मल्यार्पण करून पूजन करण्यात आले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य गीत "जय जय महाराष्ट्र माझा" याचे गायन करण्यात आले.
डॉ. ज्ञानेश हटवार यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांनी आपल्या शौर्याने मुगल साम्राज्याचा नायनाट केला व स्वराज्य स्थापण केले. गनिमी कावा वापरणारे, धर्मनिरपेक्ष, कुशल प्रशासक, दूरगामी विचार करणारे ते प्रजा पालक,रयतेचा राजा होते, असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. किशोर ढोक यांनी केले . कार्यक्रमाचे संचालक प्रा. प्रवीण मत्ते यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश नंदनवार यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येत प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संखेत उपस्थित होते.