शहरातील विविध समस्यांविषयी दिली माहीती .!
भद्रावती (ता.प्र.) - ऐतिहासिक नगरी म्हणून ओळखलं जाणाऱ्या शहराला मागील काही दिवसापासून समस्यांचे आणि गुन्हेगारीचे शहर अशी नविन ओळख होत असतांना चे चित्र पहायला मिळत आहे. याविषयी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी यांनी नविन ठाणेदार यांच्याही भेटुन चर्चा केली आणि शहरातील समस्यांकडे लक्ष वेधले.
भद्रावती शहरात चोरी, भ्रष्टाचार, अवैध धंदे, अल्पवयीन मुलांचे अंदाधुंद दुचाकी चालवणे, रस्त्यावर कोठेही गाड्या उभ्या करून रहदारीला अडथळा निर्माण करणे तसेच ठिकठिकाणी रस्त्यावर तर कोठे रस्त्याच्या कडेला पानटपरी उभ्या दिसतात. त्यामुळे खर्रा खाणाऱ्या शौकिनांची तौबा गर्दी असते. दुचाकी, चारचाकी रस्त्यावर उभ्या ठेवुन खर्रा दुकानासमोर गर्दीमुळे येजा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. शहरातील सर्व चौकातील सीसीटीव्ही कॅमेराचे नियमित निरिक्षण करून भरधाव चालविणाऱ्या दुचाकीस्वारावर कठोर कारवाई करावी. बाळासाहेब ठाकरे गेट समोर आधी असलेली पोलिस चौकी पुन्हा चालू करावी जेणे करून अनियंत्रित वाहतूकीवर लक्ष ठेऊन संभाव्य अपघात टाळता येईल. संपूर्ण शहरातील फुटपाथ मोकळे करून पादचाऱ्यांस होणारा त्रास नाहिसा करावा तसेच रस्त्यावर उभे असणाऱ्या वाहनांवर ठोस कारवाई करावी. अशी मागणी ग्राहक पंचायत भद्रावतीने नविन ठाणेदार विपिन इंगळे यांच्याकडे केली आहे. इंगळे यांनी त्वरित कारवाई करण्याचे आस्वासन दिले. यावेळी ग्राहक पंचायत भद्रावती चे पुरुषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, अशोक शेंडे, प्रविण चिमुरकर, सुदर्शन तनगुलवार, गुलाब लोणारे यांची उपस्थिती होती.