शिवजयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न .!

भद्रावती (ता.प्र.) - विविध कार्यक्रमाच्या आयोजन श्री श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती तर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष श्री छत्रपती शिवाजी महाराजश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे शिवाजी महाराज जयंती महोत्सवाप्रित्यर्थ जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आशीर्वाद सभागृह भद्रावती येथे काल संपन्न झाली. जिल्ह्यातील 45 वक्तृत्व स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला या स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्ष डॉक्टर विशाल शिंदे, उद्घाटक नंदू पढाल,परीक्षक म्हणून डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ. शहारे ठाकरे व सातपुते सर हे मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी नंदू पढाल नगरसेवक यांनी भद्रावती मध्ये स्वराज्यवीर संघटनेतर्फे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले त्यात वक्तृत्व स्पर्धाही रक्तदान व आरोग्य शिबिर तसेचाख्यान ठेवण्यात आले ही स्तुत्य बाब असल्याचे नमूद केले. तर डॉक्टर विशाल शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यावर घेऊन नाचायचे नाहीत तर त्यांचे विचार डोक्यात घेऊन आत्मसात केले पाहिजे असे सांगितले.
श्री स्वराज्य वीर संघटना भद्रावती यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महोत्सवाप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली तसेच दि. 18/02 ला रक्तदान व आरोग्य शिबिर व दिनांक 20/02 तारखेला यूवा किर्तनकार सोपान दादा कानेरकर यांचे व्याख्यान शिंदे महाविद्यालयाच्या पटांगणावर ठेवण्यात आलेले आहे.
वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील विविध स्पर्धांनी नाव नोंदविले.यात 45 स्पर्धक या स्पर्धेसाठी उपस्थित झाले होते.यात शिवचरित्र एक संस्कार, शिवकाल व आधुनिक महाराष्ट्र, शिवकाल व लोकशाही या विषयांवर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . यात प्रथमक्रमांकाला 7001 रुपये द्वितीय क्रमांक 5001 व तृतीय क्रमांक 3001 रपये अशी बक्षीस ठेवण्यात आलेली आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदविला व उत्तम वक्तृत्वाची झलक सगळ्यांनीच दाखवली .बक्षीस वितरण 20 तारखेला होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. ज्ञानेश हटवार , डॉ. शहरे सर, ठाकरे सर व सातपुते सर यांनी जबाबदारी सांभाळली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. ज्ञानेश हटवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर विविध विषयांवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले, यातून शिवाजी महाराजांचे विचार विद्यार्थ्यांनी जाणून घेतलेत व त्यांची बौद्धिक प्रगल्भता झाली. असेच बौद्धिक कार्यक्रम या संघटनेने घेत राहावे अशीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.या स्पर्धेच्या आयोजनात स्वप्निल मोहितकर युगल ठेंगणे निखिल बावणे, अभी उंबरे,शिवा पांढरे व सगळ्या सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.