एक रुपयात लग्न लावण्याचा उपक्रम प्रशंसनीय .!

माना जमात वधू-वर सूचक मंडळाचा एक रुपयात लग्न लावण्याचा उपक्रम प्रशंसनीय - खा.बाळूभाऊ धानोरकर
भद्रावती (ता.प्र.) - माना जमात वधू-वर सूचक मंडळाचा एक रुपयात लग्न लाऊन देण्याचा उपक्रम प्रशंसनीय असून पुढच्या वर्षी याच मेळाव्यात ५१ जोडप्यांचे शुभमंगल पार पडले पाहिजे असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले.
      ते येथील माना जमात वधू-वर सूचक मंडळातर्फे आयोजित आदिवासी माना जमातीच्या राष्ट्रीय उपवर-वधू परिचय मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे कार्याध्यक्ष शंकरराव गरमडे मंचावर उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय आदिवासी धर्म परिषदेचे अध्यक्ष विश्वनाथ वाकडे, केंद्रीय कोअर कमिटी सदस्य नारायण गजभे, सामाजिक कार्यकर्ते हरिदास श्रीरामे, डॉ.गोपिचंद गजभे, माना आदिम जमात मंडळाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष शत्रुघ्न चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रा. विश्वनाथ राजनहिरे, देविदास जांभुळे, मंडळाचे अध्यक्ष संजय गायकवाड, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक उत्तम झाडे, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय जांभुळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 
      प्रथम आदिवासी माना जमातीची आराध्य दैवत माता माणिका देवीच्या प्रतिमेचे पूजन करून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मागील एक वर्षात दिवंगत झालेल्या जमात बंधू-भगिनींना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी खा.बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते जमातीच्या स्मरणिकेचे प्रकाशनही करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव गरमडे यांच्या हस्ते खा. धानोरकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच मान्यवरांच्या हस्ते मार्च २०२२च्या दहावी-बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात नयन नथ्थू वाघ, श्रेयस विजय नन्नावरे, दिप्ती संजय शेंडे, कृतिका वासुदेव दडमल, कामेश्वरी गुलाब घरत, वैष्णवी हिवराज जीवतोडे, अवंती शत्रुघ्न नन्नावरे, कुणाल गोपिचंद गजभे, रक्षाकरी बंडू दडमल, शिवम दिवाकर वाकडे या गुणवंतांचा रोख रक्कम, गौरव चिन्ह, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तर जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संजय जांभुळे यांचाही यावेळी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सुनील नन्नावरे व सचिन मानगुळधे या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
      उपवर-वधू परिचय कार्यक्रमात अनेक युवक-युवतींनी आपला परिचय दिला. त्यात काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये युवकांमधून निलेश नागोराव गायकवाड व युवतींमधून प्रणाली आनंदराव गजभे यांना मंडळातर्फे भेट वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आली. या मेळाव्यात सचिन सुधाकर ढोक रा. धामनी ता.भद्रावती आणि पायल अरविंद चौखे रा. केसलाबोडी ता. चिमूर यांचा शुभविवाह केवळ एक रुपया नाममात्र शुल्क घेऊन मंडळातर्फे लाऊन देण्यात आला. तसेच त्यांना संसारोपयोगी वस्तू मंडळाकडून भेट म्हणून देण्यात आल्या.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू हनवते यांनी केले. संचालन रुपचंद धारणे यांनी केले, तर आभार दामोदर दोहतरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनीष केदार, दत्ता नन्नावरे, सुनील नन्नावरे, पांडुरंग श्रीरामे, देवराव घरत, अमोल हनवते, लिमेश जीवतोडे, राजू बगडे, राजू जीवतोडे आणि मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला आदिवासी माना जमात बंधू-भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.