रोशनी चतारे हिने पटकाविले सिल्हर मेडल .!

तायकांदो स्पर्धेत राज्यस्तरावर द्वितीय .!
भद्रावती (ता.प्र.) - जळगाव येथे झालेल्या झालेल्या राज्यस्तरीय तायकांदो स्पर्धेत यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीची विद्यार्थिनी रोशनी चतारे हिने 42 ते 48 वजन गटात राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहे . 
यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी कुमारी रोशनी चतारे हिने राज्यस्तरीय तायकांन्दो स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला व तिला सिल्वर मेडल मिळाले आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा भव्य सत्कार करण्यात आला. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव तथा तायकोन्दो जिल्हा अध्यक्ष डॉ.विशाल शिंदे,प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, रमेश चव्हाण, प्राचार्य एम. यु .बरडे, तायकांदो जिल्हा सचिव सतीश खेमसकर यांच्या उपस्थितीत तिचा भव्य सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी किशोर ढोक, डॉ. ज्ञानेश हटवार, डॉ. प्रशांत पाठक, माधव केंद्रे, नरेश जांभुळकर, हरिहर मोहरकर समस्त प्राध्यापक वर्ग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर यश संपादन केल्याबद्दल परिसरात तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.