वणीत विविध क्षेत्रातिल गौरवांचा सत्कार व रक्तदान शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद .!
वणी (वि.प्र.) - शिवजन्मोत्सव समिती वणी यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा २०२३ आणि रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला. शिवजन्मोत्सव समिती ही गेल्या ५ वर्षापासून शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतात. रक्तदान शिबिर व कार्यक्रमाचे उद्घाटन संजयभाऊ खाडे अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड,वणी तर शिवप्रतिमेचे पूजन ॲड. कुणाल विजयबाबू चोरडिया अध्यक्ष श्रीकृष्ण जन्माष्टमी समिती यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे अरुणभाऊ राजुरकर सामाजीक कार्यकर्ते, उमेशजी पोद्दार सामाजिक कार्यकर्ते, सौ.वंदनाताई आवारी अध्यक्ष महिला कॉंग्रेस यवतमाळ जिल्हा, गुरुदेवभाऊ चिडे भा.ज.पा.पु.मो.तालुका उपाध्यक्ष, राजेशभाऊ पहापळे अध्यक्ष धनोजे कुणबी समाज संस्था, प्रदिपभाऊ बांदूरकर सामाजिक कार्यकर्ते, डॉ. स्वप्नीलजी गोहोकारअध्यक्ष आदर्श नागरी सहकारी पतसंस्था वणी, भैय्याजी खाडे सामाजिक कार्यकर्ते, अनिकेत दादा चामाटे माजी अध्यक्ष शिवजन्मोउत्सव समिती वणी, तर सूत्रसंचालन शुभमभाऊ कडू यांनी केले. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले. तसेच सर्व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध नृत्याचे आयोजन शिवजन्मोत्सव समिती वणी द्वारा करण्यात आले होते. शिवजन्मोत्सव समिती वणीचे अध्यक्ष साई नालमवार, उपाध्यक्ष नितीन गोरे, सचिव गौरव ताटकोंडावार,ज्यांचे विशेष सहकार्य लाभले समितीचे कार्याध्यक्ष रितेश पचारे, कोषाध्यक्ष योगेश तुराणकर,समितीचे सचिव संदीप ठोंबरे,रौनक लामसोगे,कुणाल पुंज आणि इत्यादी उपस्थित होते.