सम्यक म्युझीकल ग्रुप, नागपूर चा संकल्प २८ माता रमाई जयंती दिनी.!
नागपुर (वि. प्र.) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बचाव आंदोलन समिती, अंबाझरी, नागपूर अंतर्गत मंगळवार दि. ७/२/२०२३ रोजी मातोश्री रमाबाई आंबेडकर १२५ व्या.जयंती निमित्ताने सम्यक म्युझिकल ग्रुप, नागपूर तर्फे आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. त्याचप्रमाणे आज जयंती प्रित्यर्थ रमाई, भिम - बुद्ध गाण्यांचा कार्यक्रम दुपारी १२.०० ते ४.००पर्यंत घेण्यात आला. या भिमबुद्ध गाण्यांच्या कार्यक्रमात गायक विलास बागडे, मिलींद डांगे, प्रभा वासनिक, अल्का चौकीवर, वंदना धाबर्डे, माधुरी वंजारी, सोपान डोंगरे, अर्चना चंदनखेडे, शंकर मेश्राम, सचिन देशभ्रतार, शालिनी सरोदे व संदेश हाडके यांनी गायन केले. कार्यक्रमाचे संचालन अॅड् स्मिता ताकसांडे आणी लक्ष्मी कांबळे मँडम यांनी उत्कृष्टपणे संचालनाची भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाला सम्यक म्युझिकल ग्रुप चे संचालक सुधिर वाळके, समाजसेवक प्रसेनजीत फुसाटे, नागेश बुरबुरे, जयभीम गार्डन ग्रुप, नरेंद्र नगर चे उपासक, उपासिका तसेच आंदोलन स्थळी नागपूर मधिल विविध बुद्ध विहाराचे उपासक, उपासिका यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.