भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांचा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या व्यवस्थापन परिषदेसाठी अधिसभेत निवडून आलेल्या प्राचार्य गटातील खुल्या प्रवर्गातून दणदणीत विजय झाला.
प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांनी प्राचार्य गटातून व्यवस्थापन परिषदेवर निवडून आल्याचे श्रेय भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती चे अध्यक्ष डॉ विवेक शिंदे व यंग टीचर्स असोसिएशनचे डॉक्टर प्रदीप घोरपडे यांना दिले.
विद्यापीठाचे संचालन करणारी महत्त्वाची समिती म्हणून व्यवस्थापन परिषदेकडे बघितले जाते त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्त्व आहे. या व्यवस्थापन परिषदेच्या निवडणुकीला अभवीप , शिक्षण मंच व यंग टीचर्स असोसिएशन यांनी आपले उमेदवार रिंगणात उभे केले होते. त्यात यंग टीचर्स असोसिएशनचा मोठ्या मता धिक्याने विजय झाला.
प्राचार्य डॉ. एल. एस. लडके यांचा व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य गटातून निवडून आल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था , भद्रावती चे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे , सचिव डॉ. कार्तिक शिंदे , सहसचिव डॉ. विशाल शिंदे, अजय आसुटकर यांनी त्यांचे अभिनंदन करीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्राचार्य डॉ. लडके यांचे अभिनंदन करीत त्यांच्या विजयाचा जल्लोषसात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होत आनंद साजरा केला.
प्रा. डॉ. लडके यांचा व्यवस्थापन परिषदेवर निवडून आल्याबद्दल त्यांचे समाजाच्या विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.