नागपुर (प्रा.राहुल जी.गौर) - भोई गौरव मासिकाद्वारे जागतिक महिला दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या महिला विशेषांकाचे प्रकाशन शनिवार दिनांक 11 मार्च 2023 ला महात्मा गांधी उद्यान हनुमान नगर नागपूर येथे करण्यात आले.या मासिका द्वारे प्रकाशित करण्यात आलेला हा पाचवा महिला महिला विशेषांक आहे. या प्रसंगी राष्ट्रीय टेबल टेनिसपटू सौ. चित्रा मेश्रे, पोलीस विभागात कार्यरत सौ. छाया पोईनकर तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये उभ्या असलेल्या सौ. रंजना सुरजुसे या तिन्ही महिला भगिनींचां मुख्य संपादक श्री. चंद्रकांत लोणारे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्याला प्रा. भारती दवणे, सौ. कल्पना चाचेरकर, सौ. वर्षा बावणे सौ. सुशीला लोणारे. कू छाया मोहंकर, श्री किशोर ढाले,श्री अनुप बावणे, प्रा राहूल गौर, इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. राहूल गौर यांनी केले तर आभार श्री किशोर ढाले यांनी मानले या प्रसंगी तिन्ही सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.