जुन्या पेंशनसाठी बेमुदत संप .!
भद्रावती (ता.प्र.) - जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात बेमुदत संप सुरू आहे. महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना,आरोग्य कर्मचारी संघटना, तहसील कार्यालय कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, महाविद्यालयाचे कर्मचारी, कृषि विभाग, समस्त कर्मचारी संघाच्या वतीने 1982 ची जुनी पेन्शन योजना चालू करावी, कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क बहाल करावा या व ईतर मागणीसाठी समस्त विभागातील कर्मरचारी संपावर आहेत . म्हातारपणाचा आधार असलेली काठी म्हणजे जुनी पेन्शन हा त्यांचा सन्मान आहे, तो आम्हाला प्राप्त झाला पाहिजे या मागणीसाठी भद्रावती तहसील कार्यालयात शेकडो च्या संख्येने कर्मचारी एकत्र येऊन बेमुदत आंदोलन सुरू आहे.
यामुळे समस्त कार्यालय ओस पडलेले असून, जनसामान्य नागरिकांची कामे ठप्प झालेली आहेत. या आंदोलनामुळे महाराष्ट्र पूर्णतः बंद झाला आहे. तेव्हा या कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्या मान्य कराव्या, व र्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करावी या मागणीसाठी हे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सगळ्याच संघटनेचे प्रतिनिधी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यात विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. डॉ. ज्ञानेश हटवार, आकांक्षा बन्सोड, अजय बोंडे ,जगदीश ठाकरे, संकेत मालपाणी, विशाल गावंडे, नंदनवार सर तसेच समस्त कर्मचारी बंधू उपस्थित होते. जोपर्यंत जुनीपेंशनची मागणी मान्य केलीजात नाही तो पर्यत हे आंदोलन सुरूच राहील.