भद्रावती (ता. प्र.) - येथे नुकताच बँक ऑफ इंडिया मध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर आदे - व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया भद्रावती हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सीमित जिवणे - बँक अधिकारी,सौरभ रंगारी बँक अधिकारी,शुभम उतखेडे बँक अधिकारी,संजय कुमार चौधरी क्याशियार बँक अधिकारी,ज्योती लालसरे - शहर अभियान नगर परिषद भद्रावती हे मंच्यावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून भास्कर आदे म्हणाले की महिला बचत गट व महिला सक्षमीकरण महिलांचे व्यवसाय इत्यादी योजनेची माहिती दिली व महिला दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले की महिलांच्या आयुष्यातील टप्पे सांगताना मुलगी - बहीण - आई - सून - पत्नी - मैत्रीण - सहकारी अशा विविध भूमिका अत्यंत प्रामानिक पणे ती पार पाडते न थकता संपूर्ण कुटुंबासाठी ती झटते इतिहास साक्षी आहे अनेक यशस्वी पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा आधार होता तिच्यात विश्व सामावलेले आहे ती कुटुंबाचा कणा आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चारुशीला निमकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मनोहर कुडे यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता प्रियंका उमरेडकर - वृवदास जांभुळे - मनोहर तोटावार - उषा आमटे इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.