मानधन वाढीसाठी 28 मार्च रोजी दिल्ली संसद भवनावर देशव्यापी मोर्चा काढण्याचा आयटक चा इशारा .!
भद्रावती (ता. प्र.) - भद्रावती गेल्या 15 ते 20 वर्षांपासून राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजने अंतर्गत अगदी 1500 रु तुटपुंज्या मानधनात जिल्हा परिषद व प्रायव्हेट शाळेत दुपारचे भोजन बनविणाऱ्या शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे,प्रमुख मार्गदर्शनात स्थानिक हुतात्मा स्मारक येथे 13 मार्च 2023 रोजी मेळावा आयोजित करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक तथा आयटक चे संघटक कॉ राजू गैनवार, भाकप चे राज्य कौन्सिल सदक्ष कॉ.रवींद्र उमाटे, कॉ.कॉप्टन अरविंद,तालुका अधक्ष कॉ.छाया मोहितकर ग्राम पंचायत संघटनेचे सुभाष मोहीतकर, शापोआ संघटनेचे तालुका सचिव कॉ.नसरीन पठाण,संघटक रेखा टोंगे, माला गायकवाड आदी उपस्थित होते.
मेळाव्यात कर्मचाऱ्यांन च्या विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली ज्या मध्ये कर्मचाऱ्यांना किमान 24 हजार वेतन देण्यात यावे,चपराशी कम कुक या पदावर नियुक्ती देण्यात यावी, सामाजिक सुरक्षा लागू करण्यात यावी,डिसेंबर पासूनचे थकीत इंधन बिल व फेब्रुवारीचे मानधन त्वरित देऊन यापुढे दर महिन्याला देण्यात यावे कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने कामावरून कमी करू नये,त्यांच्या कामाशिवाय अतिरिक्त कामे सांगू नये ,सेंट्रल किचन रद्द करण्यात यावी,सर्व शाळेत ग्यास सिलेंडर ,धान्यादि माल व खाद्य तेल उपलब्ध करून देण्यात यावे,दरवर्षी करार नामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागल्या पासून नियुक्ती पत्र देण्यात यावे तसेच शापोआ कर्मचाऱ्यांना ओळख पत्र व वर्षातून दोन गणवेश देण्यात यावे.12 महिन्याचे मानधन देण्यात यावे किमान वेतन मिळेपर्यंत दहा हजार रुपये मानधन वाढ लागू करण्यात यावी तसेच दिवाळी बोनस लागू करण्यात यावे आदी मागण्या विषही चर्चा करून 2023 हे वर्ष शापोआ कर्मचाऱ्यांनच्या मानधन वाढीचे असले पाहिजे असा निर्णय घेऊन येत्या 28 मार्च 2023 रोजी दिल्ली संसद भवनावर विशाल देशव्यापी मोर्चा काढणार असल्याची माहिती कॉ विनोद झोडगे यांनी दिली.मोर्च्यात हजारोच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयटक संघटनेने केला आहे.
मानधन वाढ व थकीत मानधन साठी यावेळी तालुक्यातील शेकडो शापोआ कर्मचारी उपस्थित होते.मेळाव्याचे संचालन कॉ.राजू गैनवार तर आभार वंदना मांढरे यांनी केले.