भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष अविरोध .!

विवेकानंद जनार्धन पारोधे अध्यक्ष तर विनोद वामनराव पांढरे उपाध्यक्ष पदी विराजमान .. वरोरा-भद्रावती विधानसभा शिवसेना (ठाकरे) प्रमुख रवींद्र श्रीनिवास शिंदे यांचे नेतृत्व ..!

भद्रावती (ता. प्र.) - स्थानिक विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या गाजलेल्या विजयानंतर येथील रवींद्र शिंदे वरोरा-भद्रावती शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्या नेतृत्वात भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक अविरोध झाली.
नवनियुक्त संचालक मंडळाने शांत संयमी विवेकानंद जनार्धन पारोधे यांची भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी  तसेच सहकार क्षेत्रात दांडगा अनुभव असलेले व महाराष्ट्र शिक्षक परिषद नागपूर विभागाचे उपाध्यक्ष विनोद वामनराव पांढरे यांची पतसंस्थेचे उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजेश नामदेवराव मत्ते, विनोद दादाजी घोडे, प्रशांत मनोहरराव कारेकर, अण्णाजी जनार्दन लांबट, राजेंद्र वसंतराव धात्रक, वर्षा राजेश ठाकरे, शालुताई विकास आसुटकर, बंडू देवाजी नन्नावरे, ज्ञानेश्वर राजाराम डुकरे नविन संचालक मंडळात कार्यरत झाले आहेत.
या पतसंस्थेची माननीय बळवंतदादा गुंडावार, शरद जीवतोडे, नामदेवराव मत्ते, चंद्रकांत गुंडावार यांनी स्थापना केली. तिला पुढे यशस्वी वाटचाल करण्याकरीता रविद्रं शिदे यांचे नेतृत्वात स्व. जनार्दन पारोधे तसेच इतर मान्यवर सोबतच स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल चारीटेबलें ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांच्या मार्गदर्शनात विकासाकडे वाटचाल करीत आहे. 
या पतसंस्थेशी जुळलेले ज्येष्ठ सहकारयात्री यांनी पतसंस्थेच्या विकासाकरिता सतत कार्य केले. वित्तीय संस्थेचा कार्यभार हा फार काटेकोर व नियमांचे तंतोतंत पालन करुन करावे लागते ही फार मोठी जवाबदारीचे काम आहे. लहान मोठे व्यापारी व संस्थेचे सभासद यांची जमापुंजी ठेवीच्या रुपात संस्थेत असते दिलेले कर्ज वेळेत वसुल करण्याची जवाबदारी सस्थेच्या विश्वस्त मंडळांची असते ही जवाबदारी मागील १५ वर्षापासून संचालक मंडळाने चांगल्या रितीने पार पाडली त्यामुळे संस्था ही नफ्यात असुन लेखापरिक्षण वर्ग “अ“ प्राप्त आहे. या संपुर्ण बाबीचे पालन करुन पतसंस्थेला आर्थिक विकासाच्या उच्चांकावर घेवून जाण्याचा मानस विद्यमान संचालकांचा राहील, असे रवींद्र शिंदे संचालक मंडळाच्या वतीने यावेळी म्हणाले.
विधानसभा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्यासह रोहन कुटेमाटे, विश्वास कोंगरे व सहकारी मित्र मंडळी यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांचे अभिनंदन केले व भद्रावती तालुका नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रगतीकरिता शुभेच्छा दिल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी, तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्या., भद्रावती तर्फे पारदर्शक व चोख पध्दतीने सदर निवड प्रक्रिया राबविली.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.