माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे यांची उपस्थिती.!
भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतर्फे घोणाड सेवा सहकारी संस्थेच्या कर्जदार सभासदांना सहा दुचाकी वाहनकर्ज रक्कम रु. ७ लाख ८४ हजार चे वाटप करण्यात आले.
यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवींद्र शिंदे उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक वडगावकर, निरीक्षक आर. आर. बाराहाते, व सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सौ. आशा उरकुंडे, सचिव बोबडे यांचे हस्ते चाब्या देवून दुचाकी वाटप करण्यात आल्या.
जिल्हा बँकेतर्फे शेतकरी, शेतमजूर, महिला व बेरोजगार यांचे करीता विविध कल्याणकारी योजना सुरू आहेत. बेरोजगारांकरीता स्वावलंबी रोजगार योजना आहे. बचत गटांसाठी अनेक महिला विकासाच्या योजना आहे. या योजनांची माहिती घेवून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन रवींद्र शिंदे यांनी केले. यावेळी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.