खेळाडूंनी खेळाच्या माध्यमातून करिअर घडवावे - प्राचार्य डॉ.जयंत वानखेडे


शिंदे महाविद्यालयात खेळाडूंना प्रमाणपत्र वितरण .!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथे शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये  राज्य स्तरावर, विभाग स्तरावर तसेच जिल्हास्तरावर खेळलेल्या  खेळाडूंना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच खेळामध्ये लक्ष देऊ स्वतःचे करिअर घडवावे, असे मार्गदर्शन केले.
शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय, भद्रावती येथील अनेक खेळाडूंनी राज्य स्तरावर, विभाग स्तरावर व जिल्हा स्तरावर यश संपादन केले. या  विविध खेळांमध्ये विजय झालेल्या खेळाडूंना त्यांना मिळालेले प्रमाणपत्र महाविद्यालयाच्या वतीने खेळाडूंना वितरित करण्यात आले. यावेळी  अध्यक्ष  प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्रमुख अतिथी डॉ.सुधीर मोते, प्राध्यापक उज्वला वानखेडे, रमेश चव्हाण हे व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन केलेल्या खेळाडूंना त्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानितत आले, सोबतच त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भद्रावती शिक्षण संस्था, भद्रावतीचेे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले. 
कार्यक्रमाचे संचालन प्रा. किशोर ढोक यांनी केले तर  आभार प्रदर्शन अशोक पीदूरकर यांनी केले. यावेळी डॉ. ज्ञानेश हटवार, शेखर जुमडे, नरेश जांभुळकर , समस्त प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.  कार्यक्रमाला सर्वच खेळाडू , विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.