वणीत जाहीर सत्कार सोहळा व प्रा. ज्ञानेश वाकुडकर, नागपूर यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम जातनिहाय जनगणना कृती समिती व महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना वणी-झरी-मारेगाव यांच्या वतीने आयोजित .!
बल्लारपुर (का.प्र.) - महाराष्ट्राचे भूषण डॉ. भालचंद्र चोपणे साहेब आणि विधानपरिषदेकरिता नवनिर्वाचित आमदार सुधाकर अडबाले, धिरज लिंगाडे, अभिजीत वंजारी यांचा सत्कार तसेच प्रा.ज्ञानेश वाकुडकर, नागपूर यांचे जातनिहाय जनगणना व OBC(VJ, NT, SBC) आंदोलनाची भूमिका या विषयावर व्याख्यानाचे आयोजन दि. 4 मार्च 2023 रोज शनिवारला वसंत जिनिंग लॉन, वणी येथे सायंकाळी 6.30 वाजता करण्यात आले आहे. जाहीर सत्कार सोहळाच्या अध्यक्षस्थानी ॲड. वामनराव चटप प्रमुख-विदर्भ राज्य आंदोलन समिती तर उद्घाटक बाळूभाऊ धानोरकर खासदार चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा, स्वागताध्यक्ष संजय खाडे अध्यक्ष रंगनाथ स्वामी अर्बन लिमिटेड,वणी आहेत. या जाहीर सत्कार सोहळ्यात प्रा. ज्ञानेश वाकुडकर अध्यक्ष लोकजागर अभियान,नागपूर हे "जातनिहाय जनगणना आणि OBC(VJ, NT, SBC) आंदोलनाची भूमिका" याविषयावर आपले मत मांडणार आहेत. प्रमुख अतिथी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार वणी,आमदार सुभाषभाऊ धोटे राजुरा,आमदार प्रतिभाताई धानोरकर वरोरा-भद्रावती,माजी आमदार वामनराव कासावार वणी,माजी आमदार विश्वास नांदेकर वणी, माजी आमदार संजय धोटे राजुरा,राष्ट्रीय समन्वयक राष्ट्रीय ओबीसी महासंघ अशोक जिवतोडे, जातनिहाय जनगणना कृती समिती वणी-मारेगाव-झरी अध्यक्ष प्रदिप बोनगिरवार उपस्थीत राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती मध्ये OBC(VJ, NT, SBC) प्रवर्गातील सर्व समाजाचे प्रतिनिधी राहणार आहेत. कार्यक्रमाचे आयोजन OBC(VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना कृती समिती आणि महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, वणी-झरी-मारेगाव, जि. यवतमाळ च्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेले आहे. !!जय ओबीसी!!!जय संविधान!! "एकच मिशन,जुनी पेन्शन"अशा घोषवाक्याखाली समस्त ओबीसी समाजबांधवानी, जुनी पेन्शन संघटनेच्या सदस्यांनी आणि वणी-मारेगाव-झरी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.