भद्रावती (ता. प्र.) - "मराठी भाषा ही अमृततुल्य भाषा आहे. तिचा गौरव वेगळ्या शब्दात करण्याची गरज नाही. ज्याप्रमाणे मुलांनी आपल्या आईवर प्रेम करावे आणि आईने मुलांवर जीव लावावा या प्रेमाला जगात तोड नाही. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी मराठीवर अमृततुल्य प्रेम करायला शिकले पाहिजे" असे विचार विवेकानंद महाविद्यालयातील मराठी भाषा विभागप्रमुख डॉ.रमेश पारेलवार यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील "मराठी भाषा गौरव दिन" कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात आभासी पद्धतीने झालेल्या या कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन डॉ. यशवंत घुमे यांनी केले. या कार्यक्रमांत वैशाली जिवतोडे, कल्याणी जिवतोडे, प्रियंका जिवतोडे, कोमल बारेकर, आचल बारेकर, ज्योत्स्ना बारेकर, अश्विनी वाकडे, ज्योतिश्री वाकडे, तृप्ती नन्नावरे, तेजस्विनी नन्नावरे, प्रियंका नन्नावरे, काजल सोनवाणे, शितल पुसनाके, पुनम गजभे, काजल कुत्तरमारे, आरती जांभुळे, निकिता मानकर, सुषमा गजभे, पवन श्रीरामे, मयूर वाघ इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.