भद्रावती (ता.प्र.) - येथील भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयात नुकताच कॉमरेड शहीद भगतसिंह - कॉमरेड शहीद राजगुरू - कॉमरेड शहीद सुखदेव यांना विनम्र अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सर्व प्रथम पाहुण्यांचे पुष्पमालेने स्वागत करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉमरेड प्रकाश रेड्डी - राज्य कार्यकारणी सदस्य - अखिल भारतीय किसान सभा हे होते.कार्यक्रमाचे उ्दघाटक कॉमरेड राजू गैनवार - माजी नगरसेवक तथा जिल्हा सहसचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष हे होते.व प्रमुख पाहुणे म्हणून विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
उदघाटक म्हणून कॉमरेड राजू गैनवार म्हणाले की शहीद कॉमरेड भगतसिंह यांचे बाबत हे विशेषतत्वाने खरे आहे कॉमरेड शहीद भगतसिंह यांनी आपल्या अवघ्या तेवीस वर्षाच्या आयुष्यात केलेले कार्य अभिमानास्पद तर आहेच पण त्यापेक्षा इतक्या कमी वयात त्यांनी केलेला अभ्यास आणि अत्यंत सुस्पश्ठ अशी वैच्यारिक मांडणी थक्क करणारी आहे शहीद कॉमरेड भगतसिंह यांनी वारंवार क्रांती म्हणजे काय या बद्दल लिहिताना हिंसा हा क्रांतीचा स्थायीभाव नसून अन्याय आणि शोषणावर आधार लेली व्यवस्था बदलवून समतेवर आधारलेली आणि सर्वांना फुलण्याची संधी देणारी व्यवस्था म्हणजे क्रांती हे स्पश्ठ केले आहे असे संबोधिले.
कार्यकर्त्यांनी ये भगतसिंह तू जिंदा है - मेरा रंग दे बसंती चोला असे विविध क्रांतिकारी गीत गायन केले व सर्वांनी कॉमरेड शहीद भगतसिंह - कॉमरेड शहीद सुखदेव - कॉमरेड राजगुरू अमर रहे अमर रहे - इकलाब जिंदाबाद - माक्सवाद - लेनिनवाद जिंदाबाद - लाल झेंडा लाल सलाम अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. प्रास्ताविक कॉमरेड वंदना गैनवार यांनी केले तर संचालन कॉमरेड दिलीप खांदारे यांनी केले व आभार प्रदर्शन कॉमरेड अनिल मराठे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करणे करिता कॉमरेड कोमल गैनवार - कॉमरेड रामभाऊ पारवे - कॉमरेड शुभम मरस्कोले - कॉमरेड शैलेश पारवे - कॉमरेड बेबी कुळमेथे यांनी अथक परिश्रम घेतले.