भद्रावती (ता.प्र.) - आम आदमी पार्टीची वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मागणी. प्रति पत्रकार संघ, आज दिनांक 24 मार्चला वन परिक्षेत्र निरीक्षक यांना आम आदमी पार्टी तालुका भद्रावती तसेच शहर कार्यकारणी तर्फे निवेदन देण्यात आलं. याचा विषय असा होता की की घोडपेठ येथील चंद्रपूर नागपूर हायवे वरील जीर्ण झाडाची ताबडतोब बंदोबस्त करण्यात यावा याबाबत.घोडपेठ येथील चंद्रपूर नागपूर हायवे वरील हे झाड अतिशय जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे वाहतूक करणाऱ्या तसेच गावकऱ्यांना सुद्धा या झाडापासून धोका आहे. समोरील पावसाळ्याच्या सुरुवातीला ऋतूमध्ये वारा वादळामुळे मुळे किंवा पावसाच्या अतिवृष्टीमुळे सुद्धा हे झाड कधीही महामार्गावर पडू शकते. अनुचित घटना कधीही गावकऱ्यांवर सुद्धा किंवा वाहतूक करणाऱ्या वर होऊ शकते. त्यामुळे ही अनुचित घटना होण्याआधीच प्रशासनाने याकडे गांभीर्याने आणि काळजीपूर्वक लक्ष देऊन हे जीर्ण झालेल्या झाडाला कापून त्वरित बंदोबस्त करावा हा इशारा वनविभागाला वनक्षेत्र अधिकारी यांना आम आदी पार्टी तालुका भद्रावती तर्फे देण्यात आला . घोडपेठ येथील गावकरी किंवा चंद्रपूर नागपूर हायवे वरील वाहतूक करणाऱ्यांना कोणती जीवित हवाने होऊ नये याची खबरदारी घेण्यात यावं असं आम आदमी पार्टी तालुका संयोजक सोनाल पाटील यांनी वनविभागाला आव्हान केलं. त्यावेळेस आम आदमी पार्टी तालुका संयोजक सोनाल पाटील, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, तालुका उपाध्यक्ष विनीत निमसरकर, शहर संयोजक सुरज शहा, शहर संघटन मंत्री अनिल राम,शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर सदस्य बालू भाऊ बांदुरकर, तसेच इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
घोडपेठ येथील चंद्रपूर नागपूर हायवे वरील जीर्ण झाडाचा त्वरित बंदोबस्त करा .!
byChandikaexpress
-
0