जागतिक महिला दिनानिमित्त श्री संत तुकाराम महाराज सेवा मंडळ बल्लारपूर तर्फे महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन .!
बल्लारपुर (का.प्र.) - शुक्रवार दि.१० मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकल नृत्य, समूह नृत्य, फॅशन शो स्पर्धा महिलांकरिता घेण्यात आल्या. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून श्रीमती डॉ. रजनीताई हजारे, माजी नगराध्यक्षा बल्लारपूर, तथा प्रमुख वक्त्या आणि उद्घाटक म्हणून श्रीमती. डॉ. अभिलाषा ताई गावतुरे सामाजिक कार्यकर्त्या चंद्रपूर उपस्थित होत्या. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती. तारा बरडे , सौ. शांताबाई जरीले . तथा सौ. वंदना पोटे अध्यक्ष महिला आघाडी, सौ. किरण बोबडे, उपाध्यक्षा महिला आघाडी, सौ. सोनाली काकडे, सचिव महिला आघाडी उपस्थित होत्या. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या डॉ अभिलाषा ताई गावतुरे यांनी महिलांच्या सक्षमीकरणातील अडथळे या विषयावर महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये महिला ऑटो चालक सपना पाटील यांचा रजनीताई हजारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धांचे गुणदान परीक्षक म्हणून सौ. सोनाली आमटे आणि श्री सुभाष पेंदोर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रीती पावडे तथा सौ. मनीषा घुगुल यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. शैला फटाले यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सौ. ललिता बोबडे, सौ. माधुरी लांडे, सौ. मेघा कोंडेकर, सौ . इंदुताई राजूरकर तथा श्री संत तुकाराम मंडळ कर्मचारी श्री. चंद्रभान वाढाई, श्री सागर ठावरी, श्री. प्रशांत मेश्राम यांनी कष्ट घेतले. या कार्यक्रमाला महिलांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

