जय श्रीरामाचा जयघोष .. उत्साही वातावरण अयोध्येतील राममंदिरातील काष्ठपुजनाच्या निमित्तानं बल्लारपुरात भक्तिमय वातावरण .. !
बल्लारपुर (का.प्र.) - नवी दिल्लीतील नवीन संसद भवन अर्थात (सेंट्रल विस्टा) साठी बल्लारपूर च्या वनविभागातील व आल्लापल्लीच्या जंगलातील उच्च प्रतीच्या लाकडाच्या वापरानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या वापरासाठी सुध्दा लार्सन अँड टुब्रो कंपनीने बल्लारपुरातील चिरान या उच्च प्रतीच्या लाकडाची शिफारस केली.
वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून २९ मार्च, २०२३ ला सायंकाळी ४:३० वाजताच्या दरम्यान ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारपुरातील जगप्रसिद्ध असलेल्या मोठे लाकूड व काष्ठपुजन सोहळ्याची पूजा करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी मा.विनय गौडा (जिल्हाधिकारी चंद्रपूर),मा.रिना जनबंधू (अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रपुर),मा.सपना मुनगंटीवार,मा. चंदनसिह चंदेल (माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ), श्री हरीश शर्मा (माजी नगराध्यक्ष बल्लारपूर), मा.मंगेश गुलवाडे ह्यांच्या व्यतिरिक्त टी. व्ही. सिरीयल "रामायण, फेम राम (अरुण गोविल), सह सीता आणि लक्षणची उपस्थिती विशेष होती.
या रॅलीच विशेष आकर्षण म्हणजे वन्य प्राण्याचा देखावा नागरिकांचं लक्ष वेधून घेत होता. ज्यात हत्ती, पोपट,अस्वल,कोंबळ ई.प्राणी लक्ष वेधत होते. या निमित्तानं आदिवासी संस्कृतीची झलक म्हणुन गोंडी नृत्य, ढोल ताशा पथकं विशेष म्हणजे केवळ महाराष्ट्रच नव्हे तर तेलंगाना, कर्नाटक, गोवा व आंध्रपदेशातूनही कलावंत आले होते. ४५ प्रकारच्या विविध देखाव्याच्या माध्यमातून मिरवणुकीद्वारे काष्ठपुजन रॅली ही बल्लारपूर वनविभागाच्या एंट्रीगेट पासून सुरु झाली. सदर रॅली चंद्रपुरातील महाकाली मंदिरात वंदन करून क्लब ग्राउंडवर समारोप झाली. त्या ठिकाणी सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांचा भक्तीगीतांचा बहारद्वार कार्यक्रम संपन्न झाला. या पूजे करिता तिरुपती बालाजी देवस्थानच्या माध्यमातून १५ हजार लाडू प्रसाद स्वरूपात वाटण्यात आले. विशेष म्हणजे बल्लारपूर शहरात या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने शहरातील विविध मंदिर, गुरुद्वारा, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून एकूण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होता.