भद्रावती तालुक्यातील मांगली गावात दोन जनाची निघृण हत्या .. मंदिरात झोपलेल्या दोघांची झोपेतच हत्त्या करून दरोडेखोर दान पेटीसह पसार .!!
भद्रावती (ता.प्र.) - भद्रावती तालुक्यातील नवरगाव रिट मांगली येथे बाबुराव खारकर यांच्या शेतात जग्गनथ बाबा यांचा मठ आहे व बाजूला मधुकर खुजे यांचे शेत आहे . हे दोघेही या मठात रात्री झोपले असतांना दरोडेखोर यांनी त्या दोघांचीही हत्त्या करून मठातील दानपेटी घेऊन पसार झाले. ही खळबळजनक बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलिसांनी घटनास्थळ घाव घेतली असता या मंदिर परिसरात मोठी गर्दी झाली आहे.
म्रुतक बापूराव खारकर हे 80 वर्षांचे होते तर मधुकर खुजे हे 60 वर्षांचे होते. त्यांच्या हत्येचा छडा काय लावणार तो लावणार पण निर्दयीपणे या दोघांची हत्त्या ज्या दानपेटीसाठी झाली यावरून समाजमन मात्र सुन्न झालं आहे. पैशांसाठी लोकांचा जीव घेतला जातं असेल तर महाराष्ट्रात बिहार तयार झाला का ? की हत्त्या करणारेच नेमके परप्रांतीय आहे ? याचा शोध घेणे तेवढेच महत्वाचे आहे.