जुनी पेंशन साठी भद्रावती येथे मोटर सायकल फेरी .!

भद्रावती (ता. प्र.) - "एकच मिशन - जुनी पेन्शन" च्या जोरदार घोषनांनी आज भद्रावती शहर दुमदुमून गेले.आज संपाच्या तिसऱ्या दिवशी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी तहसील कार्यालय भद्रावती येथुन बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यात जुनी पेन्शन संघटना, महाराष्ट्र राज्य कर्मचारी महासंघ, शिक्षक भारती संघटना, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, तहसील कार्यालय कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी, महाविद्यालयाचे कर्मचारी, कृषि विभाग, समस्त कर्मचारी संघाचे सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 
1982/84 ची जुनी पेन्शन योजना चालू करावी, कर्मचाऱ्यांना त्यांचा हक्क बहाल करावा, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण थांबवावे, नवीन नोकर भरती करावी या व ईतर मागण्यांसाठी समस्त विभागातील कर्मचारी संपावर आहेत . म्हातारपणाचा आधार असलेली काठी म्हणजे जुनी पेन्शन हा त्यांचा सन्मान आहे, तो आम्हाला प्राप्त झाला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी भद्रावती तहसील कार्यालय येथून सुरू झालेली ही भव्य बाईक रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत गणेशमंदिर चौक गवराळा ते परत तहसील कार्यालय अशी पार पडली. सर्व विभागाचे सर्व कर्मचारी यात सहभागी झाले होते.
सर्व कर्मचारी बेमुदत संपात सहभागी असल्याने समस्त कार्यालय ओस पडलेले असून, जनसामान्य नागरिकांची कामे ठप्प झालेली आहेत. या आंदोलनामुळे महाराष्ट्र पूर्णतः बंद झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या या न्याय्य मागण्या मान्य कराव्या, व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बहाल करावी या मागणीसाठी हे तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सगळ्याच संघटनेचे प्रतिनिधी व कर्मचारी सहभागी झाले आहेत. यावेळीही सर्व संघटनेचे सर्व प्रतिनिधी , कार्यकर्ते , कर्मरचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.