दोन दिवसीय भेटीचे आयोजन .!
भद्रावती (ता.प्र.) - स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात येत्या ३१ मार्च,२०२३ आणि ०१ एप्रिल,२०२३ रोज शुक्रवार, शनिवारला नॅक पीअर टीम भेट देत आहे.ही टीम चौथ्यांदा महाविद्यालयाचे मूल्यांकन करून प्रमाणित करणार आहे. या टीममध्ये तेलंगणा राज्यातील ओस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबाद चे कुलगुरू डॉ.डी.रविंदर अध्यक्ष आहेत.त्यांच्या सोबत गुजरात राज्यातील उद्योग व्यवस्थापन धर्मसिंह देसाई युनिव्हर्सिटी, नाडियाद येथील अधिष्ठाता डॉ.नरेश पटेल पीअर टीम समन्वयक आणि सदस्य म्हणून कर्नाटक राज्यातील श्रर्णबसवा युनिव्हर्सिटी, कलबुर्गी येथील डॉ.एस.जी.डी.पाटील उपस्थित राहणार आहेत. उच्च शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी स्थापित ही नॅक पीअर टीम प्रत्यक्ष भेट देऊन महाविद्यालयातील विद्यार्थी ,पालक, व्यवस्थापन समिती यांची ही भेट घेणार आहेत. प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात नॅक चे महाविद्यालयातील समन्वयक प्रा.मोहीत सावे आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी महाविद्यालयाचा ग्रेड वाढविण्यासाठी प्रयत्नरत आहेत.