पाच किलो गांजा जप्त ..!

भद्रावतीत १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त : चार आरोपी अटकेत .!

भद्रावती (ता. प्र.) - शहरातील मुख्य मार्गावरील पेट्रोल पंप जवळ गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या चार आरोपीसह पाच किलो गांजा जप्त करण्यात आला. यातील मुद्देमालासह १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ही कारवाई रात्री 8.00 वाजता दरम्यान करण्यात आली.
सौरभ दुर्वास कसारे, ( 22 ) वर्षे , अदनान जाकीर शेख ( 21) वर्षे, लोकेश दौलत मानकर ( 22 ) राहुल दिलीप साखरे ( 21 ) वर्ष सर्व राहणार चंद्रपूर असे आरोपींची नावे आहे. चंद्रपूर हून भद्रावती येत असतांना चंद्रपूर – नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंप जवळ गांजाची विक्री करण्यासाठी येत असल्याची गुप्त माहिती भद्रावती पोलिसांना मिळाली. त्या आधारे ठाणेदार बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर वर्मा, शशांक बद्दामवार, जगदीश झाडे ,रोहित चिटगिरे, आशिष गौरकर, मोनाली गारगाटे यांनी सापडा रचून ही कारवाई केली. आरोपीकडून पाच किलो गांजासह दोन मोटरसायकल, मोबाईल असा १ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यातील चारही आरोपींना अटक करण्यात आलीआहे. पुढील कारवाई भद्रावती पोलीस करीत आहे. भद्रावती येथे अनेक ठिकाणी गांजाची विक्री केली जात आहे. तेव्हा पोलीस विभागाने त्यांचा शोध घेऊन कठोर कार्यवाही करावी.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.