भद्रावतीकरांना वाघांपेक्षा कुत्र्यांची भिती .!

भद्रावती  (ता.प्र.) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत, भद्रावती ने नविन रूजु झालेल्या मुख्याधिकारी यांना कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्याच्याकडून नागरिकांवर होणाऱ्या हल्ले यांच्या बद्दल माहिती देऊन कारवाई करण्याकरिता निवेदन दिले.
ग्राहक पंचायत, भद्रावती दि. १८-०१-२०२१ पासुन सतत नगरपालिका भद्रावती ला पत्र देउन त्यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहे. परंतु नगरपालिका भद्रावती कडुन अजुन पर्यंत कोणतीही कारवाई केल्याची माहीती मिळाली नाही. सोशल मिडियावर कुत्र्यांचे हल्ले पाहिल्यानंतर अशी घटना भद्रावती शहरात घडु नये यासाठी ग्राहक पंचायत, भद्रावती कडुन नेहमी प्रयत्न केले जात आहे. परंतु आता ग्राहक पंचायतच्या पत्राला पण नगरपालिका प्रतिसाद देत नाही असे निदर्शनास येत आहे. 
पत्र देतांना या संदर्भात गुडगाव जिल्हा ग्राहक आयोग यांनी केस क्रमांक CC/७४१/२०२२ मध्ये एक निर्णय दिला त्याचा संदर्भ देऊन मुख्याधिकारी यांचे लक्ष वेधणेयाचा प्रयत्न केला. गुडगाव मध्ये एका व्यक्तीचे पाळलेल्या कुत्र्याने एका स्त्रीला रस्त्याने जात असताना चावल्यामुळे त्या स्त्रीला भरपूर जखमा झाल्या आणि त्यामुळे गुडगाव महानगर पालिका यांना रुपये २ लाख नुकसान भरपाई देणेचा आदेश दिला आहे. शिवाय गुडगाव मुनिसिपल कॉर्पोरेशनला फॉरेन ब्रीडचे घातक कुत्र्यांचे लायसेन्स रद्द करून ती सर्व कुत्री ताब्यात घेण्याचा आदेश दिला आहे. प्रत्येक घरगुती कुत्रे पाळणाऱ्या व्यक्तीने कुत्रे बाहेर घेऊन जाताना कुत्र्याचे तोंड व्यवस्थित बांधले पाहिजे, तसेच कुत्र्याची घाण गोळा केली पाहिजे. या बाबत आदेश दिले आहेत. शिवाय कॉर्पोरेशन ने सर्व भटकी कुत्री त्वरित पकडा असा आदेश दिला आहे. तसेच जे लोक कुत्री पाळत आहेत त्यांचेकडून सदर रुपये २ लाख वसूल करणेची मुभा कोर्टाने कॉर्पोरेशन ला दिली आहे. एवढेच नाही तर या केस मध्ये ॲनीमल प्रोटेक्शननी हरकत घेतली असता त्यांना असे कुत्रे दत्तक घेऊन बंदिस्त जागेत सांभाळण्याची ताकीद दिली आहे. त्यामुळे गुडगाव जिल्हा ग्राहक आयोग यांच्या निर्णयाला अनूषंगून ग्राहक पंचायत भद्रावती ने नगरपालिका मुख्याधिकारी यांना परत निवेदन देऊन शहरातील कुत्रे, डुकरे आणि मोकाट जनावरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
निवेदन देतांना ग्राहक पंचायत चे पदाधिकारी पुरूषोत्तम मत्ते, वामन नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, तनगुलवार, अशोक शेंडे, आगलावे, नारळे, कामाटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard.