बल्लारपुर (का.प्र.) - अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जिल्हा चंद्रपूर येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. फेब्रुवारी मध्ये ग्राहक पंचायत, जिल्हा चंद्रपूर ची नविन कार्यकारिणी विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.नारायण मेहरे आणि सचिव नितीन काकडे यांच्या उपस्थितत घोषित करण्यात आली होती. त्यानंतर ही जिल्हा कार्यकारिणी ची पहिली बैठक दि. १९ एप्रिल ला पार पडली.
बैठकीत ग्राहकांना पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या सुविधा तपासणी मोहिम राबविणे, ग्राहक तसेच ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते यांना ग्राहक चळवळीची माहीती आणि ग्राहक संरक्षण कायदा 2019 याविषयी माहिती देण्यासाठी महिन्यातुन एक दिवस अभ्यासवर्ग घेणे, ग्राहकांचे हक्क, अधिकार हे प्रत्येक ग्राहकापर्यंत कसे पोहोचतील यासाठी वेगवेगळ्या उपक्रमातुन उपाययोजना करणे. तसेच ग्राहकास लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रत्येक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात, कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या, मनुष्यबळ पुरेसे असतील यासाठी शासनाकडे मागणी करणे. अशा अनेक विषयावर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस सौ. नंदिनी चुनारकर, पुरूषोत्तम मत्ते, वसंत वऱ्हाटे, सौ. संगिता लोखंडे, आण्याजी ढवस, तन्नीरवार, वामन नामपल्लीवार, प्रविण चिमुरकर, सौ. अंजली धाबेकर, जितेंद्र चोरडिया, कानपील्लेवार, कावळे, शंकर पाल, संतोष आस्वले, पत्रु दक्षे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.