गोल्ड मेड्यालिस्ट ठरली माधुरी कटकोजवार .!

गोंडवाना विद्यापीठातुन एम.ए. हिन्दी मध्ये गोल्ड मेड्यालिस्ट ठरली माधुरी कटकोजवार

बल्लारपुर (का.प्र.) - स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाची विद्यार्थिनी जर्नालिस्ट माधुरी दीपक कटकोजवार हिचा सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रातील निकालाच्या अंतीम जाहीर झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या अंतीम यादीत एम.ए. हिन्दी विषयामध्ये सर्वाधिक गुण प्राप्त करून गोल्ड मेड्यालिस्ट म्हणून सन्मान मिळविला आहे. विद्यापीठांच्या कार्यपद्धतीनुसार गोल्ड मेड्यालिस्ट माधुरी कटकोजवार ला सिजीपीए-९.९४ आउट ऑफ १० असा असुन ओ ग्रेड मिळाला आहे. या मिळालेल्या यशाचे श्रेय माधुरी ने सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव श्री.प्रशांतजी पोटदुखे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पि.एम.काटकर सर, उपप्राचार्य डॉ.स्वप्नील माधमशेट्टीवार सर, हिन्दी विभाग प्रमुख डॉ.प्रा.सुनिताताई बन्सोड मॅडम, महाराष्ट्र हिन्दी साहित्य अकादमी सदस्य डॉ.प्रा.शैलेन्द्रकुमार शुक्ल सर आदी मान्यवरांना देत त्यांचे आभार मानले आहे. यापूर्वी ही सन २०१९-२० या शैक्षणिक सत्रात एम.ए. मास कम्युनिकेशन मध्ये ही गोंडवाना विद्यापीठाच्या मेरिट यादीत तिने स्थान मिळविले होते. लहानपणापासून तिला शिक्षणाची आवड व जीद्द होती. तिचे चवथी पर्यंत चे प्राथमिक शिक्षण महात्मा गांधी नगर परिषदेच्या शाळेमधुन , पाचवी ते दहावी मराठी सिटी हायस्कूल तर इयत्ता ११वी पासुन डबल एम.ए. पर्यंत चे शिक्षण सरदार पटेल महाविद्यालय येथे घेतले.अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे. सामाजीक व राजकिय क्षेत्रात पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेबांची समर्थक म्हणून माधुरी कटकोजवार यांना ओळखल्या जाते.

Post a Comment

Previous Post Next Post
clipboard. ".