बल्लारपुर (का.प्र.) - बल्लारपूर शहरातील (WATER ATM) आरो प्लांट खुप दिवसा पासून बंद आहे. मागील अनेक दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा प्रमाण खूप वाढला आहे या कारणाने लोकांना पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या आधी नगरपरिषद बल्लारपूर ने बल्लारपूर शहरात अनेक वार्डात ,विभागात आरो प्लांट ची निर्मिती केली. परंतु मागील अनेक दिवसापासून हे वॉटर एटीएम बंद आहेत याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याची दखल घेत भाजपा युवा मोर्चा चे जील्हा उपाध्यक्ष मोहीत डंगोरे यांनी माननीय मुख्याधिकारी साहेब न. प. बल्लारपूर यांना निवेदन देऊन या विषयाचा गांभीर्य बघून लवकरात लवकर बल्लारपूर शहरातील संपूर्ण वॉटर एटीएम ची दुरुस्ती करून पुन्हा सुरू करून नागरिकांच्या सेवेत रुजू करावे ही विनंति केली. या वेळी उपस्थित जिल्हा सचिव भाजपा युवा मोर्चा शिवाजी चांदेकर, सुरज चौबे, मनोज बालमवार होते.