बल्लारपुर (का.प्र.) - उदया गुरूवार दिनांक ११ मे २०२३ रोजी राज्यातील पत्रकारांच्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी व्हाॅईस आँफ मीडियाच्या वतीने राज्यातील संपुर्ण जिल्हे आणि तालुक्यात धरणे आंदोलन करीत आहोत.
त्यानुषंगाने आपणही चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विभागीय अध्यक्ष मा. मंगेशभाऊ खाटीक यांचे नेतृत्वात उदया दुपारी 2 वाजता पासून धरणे आंदोलन करणार आहोत. तेव्हा व्हाॅईस आँफ मीडियाचे जिल्हयात कार्यरत असलेले संपुर्ण विंगचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी यांनी शक्य असेल तर उदया ११ मे रोजी दुपारी २ वाजता पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर समोरील आंदोलन स्थळी पोहोचण्याची तसदी घ्यावी. उदया दुपारी 2 वाजतापासून आपले धरणे आंदोलन सुरू होणार असून आंदोलना नंतर मा. जिल्हाधिकारी यांना सामुहिक स्वाक्षरीचे निवेदन देणार आहोत. तरी ज्यांना ज्यांना उदया दुपारी 2 वाजता पर्यंत चंद्रपूर पोहोचणे शक्य आहे, त्यांनी चंद्रपूर येथे येण्याचे करावे.
संपुर्ण तालुकाध्य यांना विनंती आहे की, कृपया आपणही आपल्या तालुक्यात आपण ठरविलेल्या वेळेनुसार धरणे आंदोलन करून मा. तहसिलदार यांना मागण्यांचे निवेदन द्यावे आणि फोटो न चुकता पाठवावे. लक्षात घ्या आपल्या सर्वांना आपल्या हक्कासाठी लढा पुकारायचा आहे.